top of page

World Snake Day- 2021
July 16

 Every Year, 16 July is celebrated as World Snake Day worldwide. The aim of the day is to create awareness about different species of snakes. In human eyes, snakes have a negative role, and people consider them as some of the biggest enemies in animals.

RSCN2071.JPG

जागतिक सर्पदिन - 2021 
July 16

     नमस्कार  आज 16 जुलै म्हणजे जागतिक सर्पदिन, त्यामुळे प्रथमतः आपल्या सगळ्यांना सर्पमय शुभेच्छा. साप म्हणजे सगळ्यांसाठी तसा कुतुहलतेचा विषय, कारण भरपूर लोकांच्या मनात याविषयी भीती असते.
साप म्हणजे मरण ही कल्पना आपल्या मनात इतकी खोलवर रुजली आहे की साप म्हणताच अनेकांचे अवसान गलते..का?  तर साप विषारी असतो. पण माझा प्रश्न आहे तुम्हाला खरंच सगळे साप विषारी असतात का? साप दिसला रे दिसला की आपण इतके क्रुर  वागतो की तो साप विषारी आहे की नाही याचा काहीही विचार न करता  हातात जे हत्यार सापडेल त्याने सापाला जीवे मारण्याचा प्रयत्न करतो. पण हाच साप जेव्हा शिव मंदिरात दिसतो तेव्हा त्याला देवता म्हणून त्याची पूजा केली जाते.


     मग हाच साप जेव्हा आपल्या परिसरात आढळतो तेव्हा त्याला का जीवे मारले जाते? हे जर असंच चालत राहिलं तर एक दिवस असा येईल की आपल्याला फक्त गुगल च्या छायाचित्रात साप दिसतील. जसे आज आपण डायनोसॉर ला बघतो.... 


     सर्वांनी हे लक्ष्यात घ्यायला हवं की इतर जीवांचा व सापांचाही या परीसरावरती आपल्याइतकाच अधिकार आहे. त्यामुळे त्यांना मारणे पूर्णपणे चुकीचे आहे. एका उंदराच्या जोडीपासून वर्षभरात हजारो उदीर तयार होतात. उदीर लाखो टन धान्याची तसेच इतर वस्तूंची नासाडी करतात, आणि या वरती नियंत्रण ठेवण्याचे काम साप करतात. सापच जर नष्ट झाले तर शेतात पिकणारं धान्य सगळं उंदरांच्या पोटात जाईल...मग रसायन वापरुन शेतकरी उदरांना मारणार..त्यातही रसायन जास्त प्रमाणात वापरलं गेलं की मग ज्या जमिनीवर धान्य पिकवलं जातं त्याची नासाडी होणार. हे सगळं घडण्यापेक्षा शेतात साप असणं बरं नाही का? त्यामुळे त्यांच्याविषयी असणारे गैरसमज बाजूला सारा म्हणजे भिती सुद्धा आपोआप जाईल.


         माझी तुम्हां सर्वांना विनंती आहे तुमच्या परिसरात साप आढळल्यास त्याला जीवे मारु नका. तो साप विषारी आहे की बिनविषारी याची खात्री करून घ्या आणि विषारी असल्यास तात्काळ 1926 या वनविभागाच्या मदत क्रमांकावर किंवा जवळच्या सर्पमित्रांशी संपर्क साधा व निसर्गाचा हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी हातभार लावा......

लेखक:
गार्गी आढाव. 
FY Bsc Forestry,
Team YFN India.
bottom of page