top of page

International Tiger Day 

International Tiger Day has been held on the 29th July every year since 2010 when it was first created at the Saint Petersburg Tiger Summit. This was done to raise awareness of the decline of wild tiger numbers, leaving them on the brink of extinction and to encourage the celebration around the important work of Tiger conservation.

Many well known animal organisations such as the WWF, the IFAW and the Smithsonian Institute get behind this event. You can get involved in the conversation around this important day on Twitter using the hashtag #WorldTigerDay or #InternationalTigerDay .

Happy-International-Tiger-Day-2020-image
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 

आपलं बालपण व आपल्या बालपणीच्या ऐकलेल्या गोष्टी मधील सगळ्यात आवडीच पात्र म्हणजे वाघ. जंगलचा राजा वाघोबा. इसापनीती , पंचतंत्र, मोगली, टारझन व जंगल कथांमधून वाघ आपल्याला नेहमीच भेटत आला आहे. किती जवळचा आणि आवडीचा होता ना वाघोबा !
मला तर लहानपणापासून मोगलीची गोष्ट खुप आवडते. जंगलाच सौंदर्य, प्राणी पक्ष्यांची विविधता , जंगली जीवन आणि जंगलातील निरागस शांतता आपण जंगलबूक सारख्या चित्रपटातून अगदी जवळून अनुभवली. जंगलात वाढलेल आणि प्राणी पक्ष्यांसोबत खेळणाऱ्या या मुलाच्या गोष्टीत आपला वाघोबा तर एक दुष्ट प्राणी होता. पण खलनायकाच्या भूमिकेतला वाघ पण आपल्याला भवलाच की! बालपणीच्या कथांमधून ऐकलेलं ते जंगल आजही तितकं सुंदर आहे का हो? आज जेव्हा आपण जंगलांची परिस्थिती बघतो , विकासाच्या नावाखाली होणारी नासधूस बघतो ,आपल्या वाघाची व इतर प्राण्यांची दयनीय अवस्था बघतो तेव्हा माणसाला दोषी ठरविणारा व माणसाच्या पिला वर विश्वास ठेवू नका अस म्हणणारा जंगलबुक मधला वाघ नायक ठरतो की खलनायक? काही चुकीचं म्हणतोय का तो? आज आपण यावरच विचार करुया आणि आपल्या वाघोबाला थोडं जाणून घेऊया.
भारतीय संस्कृतीत वाघाला आदरयुक्त भीतीचं स्थान आहे. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य , राजबिंडे पणा, सौंदयाचे व राकटतेचे प्रतिक मानला जातो. वाघ हा देवी महिषासुरमर्दिनी आणि तिच्या अनेक रूपांचे वाहन आहे. जंगलातील आदिवासी तर वाघाला देव मानून त्याची पूजा व रक्षण करतात.

वाघ हा मार्जार कुळातील सर्वात मोठा शिकारी प्राणी आहे. वाघ हा एकटा राहणारा प्राणी असून तो स्वतःच क्षेत्र राखून ठेवतो. नरवाघाचे क्षेत्र साधारण 60 ते 100 चौ. किमी. असते व तो आपले क्षेत्र झाडांवर मूत्राचे फवारे मारून तसेच झाडांवर ओरखडे मारून अंकित करतो. भारतीय वाघाचे वजन साधारणपणे 100 ते 180 किलोपर्यंत भरते. मादी नरापेक्षा आकाराने लहान असते. मादी साधारणपणे वर्षातून एकदा तीन ते चार बछड्यांना जन्म देते आणि त्यांचा सांभाळ करते. प्रत्येक माणसाच्या हाताचे ठसे जसे वेगवेगळे असतात त्याप्रमाणे वाघाच्या अंगावरील पट्टे वेगवेगळे असतात व हीच त्यांची ओळख ठरते.या पट्ट्यांचा उपयोग शिकार करताना दाट झाडीत व गवताळ प्रदेशात दडी मारून बसण्यासाठी होतो. पट्ट्या बरोबरच वाघाच्या पंज्याची ठेवण पण वेगळी असते. 6 ते 8 इंच इतका पंज्याचा व्यास भरतो. शिकारीत तरबेज असणारा वाघ धावण्यात व पोहण्यात पण माहीर आहे .वाघ वाचवण्याचे मुख्य कारण म्हणजे वाघाचे निसर्गपरिसंस्थेतील अनन्य साधारण महत्त्व . वाघ अन्न साखळीत टोकाचे स्थान भूषवतो कारण त्याच्या पेक्षा वरचढ व ताकदवान शिकारी नाही. वाघ मुख्यत्त्वे तृणभक्षक प्राण्याची शिकार करून त्यांची संख्या नियंत्रणात ठवतो.तृणभक्षक प्राण्याची संख्या वाढली तर निसर्ग संपदेवर ताण पडेल व निसर्ग चक्र बिघडून जाईल म्हणूनच वाघ जंगलात असणं हे जंगल स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यन्त महत्वाचे मानले जाते. वाघ जंगलात असतील तर भीतीपोटी माणूस जंगलात जायला घाबरतो व काहीअंशी जंगल सुरक्षित राहण्यास मदत होते . वाघ असतील तर जंगल सुरक्षीत राहिल आणि जंगल सुरक्षित असेल तर माणूस. म्हणूनच वाघाचे अस्तित्व आपल्यासर्वांच्या अस्तित्वा साठी आवश्यक आहे.
पूर्वीच्या काळी वाघाची शिकार आणि त्याची कातडी ही प्रतिष्ठेची लक्षण मानली जायची. ब्रिटिश काळातील शौकीसाठी केलेली शिकार आणि कातडी व नखे विकून मिळणारे परकीयचलन हे व्याघ्र शिकारीचे मुख्य कारण होते व या मुळे 1970 च्या सुरवातीला भारतात केवळ 1800 वाघ उरले. वाघाच्या संख्येतील घट ही चिंताजनक बाब समजून वन्यजीवरक्षकांनी शिकारीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठविला.वन्यजीव हे भारताचे भूषण आहे व ही संपदा वाचवली गेलीच पाहिजे अशी जागृती जनमानसात होऊ लागली. यानंतर 1972 साली वन्यजीवसंवर्धन कायदा अस्तित्वात आला व वन्यजीवांना कायद्याने संरक्षण मिळाले. 1973 मध्ये लगेचच इंदिरा गांधी सरकारने व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात करून व्याघ्र संवर्धनाची मुहूर्तमेढ रोवली.1990 पर्यंत या प्रकल्पाचे चांगले फळ दिसू लागले, पण त्यानंतर परत शिकारीची संख्यावाढल्याचे आढळून आले. यांवर उपाय म्हणून 29 जुलै 2010 ला रशिया मध्ये सेन्ट पिटरबर्ग टायगर समीट झाला व त्यावर भारतासह अनेक देशानी सह्या केल्या व 2022 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करू असा निर्धार केला (Mission T*2). वाघाच्या संख्येतील वाढ किंवा घट कळण्यासाठी 2006 पासून दर 4 वर्षानी व्याघ्र गणना होऊ लागली आणि सेन्टपिटरबर्ग समिट 2010 पासून 29 जुलै हा दिवस व्याघ्र दिन म्हणून साजरा होऊ लागला. या दिवसाच औचित्य साधून 29 जुलै 2019 ला प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदींनी चौथ्या व्याघ्र गणनेचा,All India Tiger estimation ( AITE ) चा अहवाल सादर केला . व्याघ्र गणना ही जगातील सर्वात मोठी वन्य प्राणी गणना मानली जाते व या साठी सर्व अद्ययावत साधनांचा वापर केला जातो. व्याघ्रगणना 2019 च्या अहवाला नुसार वाघाची संख्या 2226 ते 2967 एवढी वाढली. मागील 4 वर्षात सुमारे 741 एवढी वाढ दिसून आली .9 व्याघ्र प्रकल्पाने सुरू झालेला प्रवास आज 50 व्याघ्रप्रकल्पा पर्यंत यशस्वी रित्या पोहचला. 2022 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय भारताने 4 वर्ष आधीच गाठले. व्याघ्रसवधनातील हे यश भारतासाठी एक वेगळी ओळख आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. लवकरच वाघाची संख्या 3000 पर्यंत पोहचेल पण 3000 वाघांना पुरेसे जंगल क्षेत्र आणि निसर्ग संसाधने उपलब्ध होतील का ? वाढती लोकसंख्या व 'माणूस - व वाघ संघर्ष' याचा मेळ बसेल का ? व्याघ्रप्रकल्पांना व जंगल क्षेत्रांना ,उद्योगधंदे व विकास प्रकल्पाचे ग्रहण लागलेच आहे. जागतिक तापमानवाढ ,हवामान बदल, वारंवार नद्यांना येणारे पूर, निसर्ग वादळा सारखी चक्रीवादळे , दुष्काळ व करोना सारखी वैश्विक महामारी या प्रश्नांची उत्तरे निसर्ग सवर्धनातच आहेत .दुखावलेल्या या निसर्गाला आता गरज आहे ती आपल्या आदराची, प्रेमाची आणि जपणूकतेची. आजच्या व्याघ्रदिनाच्यासंकल्पने नुसार " Their survival is in our hands" वाघांचे अस्तित्व आणि त्या बरोबरच निसर्गाचे अस्तित्त्व सुद्धा आपल्याच हातात आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या पुढची दिशा ठरवून, जलद गतीने वाटचाल करणे अत्यावश्यक आहे. चला तर मग , "वाघ वाचवून निसर्ग वाचवूया!".

                                                                   

                                                                        लेखन - नेहा ताम्हनकर

tiger-e1593589311714-1024x683.jpg
best hd wallpaper of tiger-1.jpg

"There is, however, one point on which I am convinced that all sportsmen - no matter whether their view point has been a platform on a tree, the back of an elephant, or their own feet - will agree with me, and that is, that a tiger is a large-bearted gentleman with boundless courage and that when he is exterminated - as exterminated he will be unless public opinion rallies to his support - India will be poorer by having lost the finest of her fauna."

- Jim Corbett 

Get social with us!

We are committed to the conservation of Nature. Awareness is the most effective way to make people environment literate. We can make people aware through education, research, and various activities. When people become environment literate, they form a group of Environment-conscious citizens.

  • Instagram
  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
Share your thoughts!

 

​Telephone : ​+91 7378777067

Email : youthfornatureindia@gmail.com

​​​

© 2020 by YouthForNature

bottom of page