अवकाश हा शब्द आपल्या कानी पडताच आपल्या डोळ्यासमोर लाखो गृह-तारे येऊन उभे राहतात.रात्री गच्चीवरुन शुभ्र चांदण्यांनी भरलेलं आभाळ बघण्यात एक वेगळच समाधान असत,याच अवकाशात कधी माणुस जाईल असा विचार आपल्या पुर्वजांनी कदाचीतच केला असेल किंवा नसेल.पण मानवजात विज्ञानाला एवढ पुढे घेऊन गेली की आजघडीला शेकडो अंतराळवीर अवकाशमोहिमा यशस्वी करुन आले आहेत.अवकाश तंत्रज्ञानामुळे मानवजातीचे जीवन सुखकर बनण्यास मदत झाली.इथपर्यंतच्या इतिहासाला आपण गरज समजू शकतो,पण गरज भागली की हव्यासाच्या(लोभी वृत्ती) मागे लागणे ही माणसाची चंगळवादी वृत्ती पर्यावरणासाठी खुप धोकादायक ठरत आहे.याचेच उदाहरण म्हणजे ११ जुलै २०२१ रोजी व्हर्जिन गेलेक्टीक या कंपनीचा मालक रिचर्ड ब्रँनसन आणि त्यांचे सहकारी जगातील पाहिले ठरले जे स्वत:च्या खासगी स्पेसशीप मधून अवकाशात गेले याच्या मागे उद्देश काय तर अवकाश पर्यटन सुरु करायचा आहे.आता अॅमेझोन चे जॅफ बेझाॅस सुद्धा २८ जुलै २०२१ रोजी स्वत:च्या रॉकेट मधून अवकाशात जाणार आहेत. स्पेसएक्स चे मालक इलाॅन मस्क यांची स्वप्ने पृथ्वीवर कधी नव्हतीच ते सुद्धा भविष्यात यात उतरतील.इलाॅन मस्क इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून पेट्रोल-डीझेल ला पर्याय उपलब्ध करत आहेत पण सामान्य माणसाच्या खिशाला त्यांची टेक्नोलॉजी परवडण्याच्या पलिकडे आहे आणि भविष्यात इलेक्ट्रिक कचरा सर्वात मोठी समस्या ठरणार हे पण तेवढच सत्य आहे. म्हणजेच सध्या आपण चंगळवाद जोपासण्याच्या नादात मानवजातीबरोबर इतर असंख्य जातीनांदेखील विनाशाकडे घेवुन जात आहोत.
Photo courtesy: New York Post
अवकाश पर्यटन जगातील फक्त ०.१% अतिश्रीमंत लोकांना परवडणारी सफर आहे. पण याच्यामुळे पर्यावरणावर होणारा परीणाम सर्व जगाला भोगावा लागणार आहे. बर याचे एका वेळचे तिकीट किती तर २ ते ३ करोड रुपये, इलाॅन मस्क यांच्या याच मोहिमेची किंमत तब्बल ५५ मिलियन डॉलर असेल म्हणजे अवकाश सफरीची मज्जा घेणार १% लोक आणि त्याच्यामुळे होणारा हवामान बदलाचा परिणाम भोगावा लागणार बाकीच्या ९९% लोकांना व असंख्य सजीव प्रजातींना.एका विमान प्रवासाला दर माणसी सरासरी ०.२किलो/माईल एवढे कार्बन इमिशन होते पण अवकाश पर्यटनाच्या माध्यमातून १२ किलो/माईल एवढा कार्बन वातावरणात मिसळणार आहे. विमानापेक्षा तब्बल ६०% जादा,याच्याही पुढे जावुन जेव्हा अवकाशात जाण्यासाठी वारंवार रॉकेट उडतील तेव्हा वातावरणात ओझोन वायू वाढेल आणि स्थितांबरामधील ओझोन कमी होईल याच्याबरोबर नायट्रस आॅक्साईड वाढेल त्याच्या समस्या वेगळ्या. हवामान बदल रोखण्यासाठी ग्रेटा थुनबर्ग ही लंडन ते न्यूयॉर्क अटलांटिक महासागरातील ११ दिवसाचा कडाक्याच्या थंडीचा प्रवास सौरउर्जेवर चालनाऱ्या नौकेतून करते. एवढ्या हालअपेष्टा मुद्दामुन कोण सहन करेल? हा सगळा खटाटोप तिची विचारपूर्वक जिवनशैली व्यक्त करते, जो की मानवजातीला वाचवण्याचा विचार असतो.
Photo courtesy: The Daily Beast
भारताच्या दृष्टीने विचार केला तर या अवकाश सफरीचा आनंद फक्त आपल्या देशातील काही सिनेस्टार,राजकिय नेते,काही क्रीकेटर आणि मोठे उद्योगपती यांनाच घेता येईल.भारतातील १% श्रीमंत लोकांकडे ५८.४ % एवढी संपत्ती आहे आणि १९ % संपत्ती ९०% लोकांकडे आहे.या १% लोकांच्या चंगळवादी वृत्तीचा परिणाम बाकीच्या ९९% लोकांना भोगावा लागतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे २०१७ साली हवा प्रदुषणामुळे आपल्या देशात १२ लाख लोक मरण पावले म्हणजेच प्रत्येक दोन मिनीटांत एक मृत्यू , २०१९ ची आकडेवारी सुद्धा आता प्रसिद्ध झाली आहे त्याच्या मधे १२ लाखाचे वाढून १७ लाख मृत्यू हवाप्रदूषणाने झाले. भारतात दर वर्षी मरण पावनार्ऱ्यापैकी ५८% मृत्यू हे हवाप्रदूषणामुळे झाले आहेत.
पुढची काही शतक तरी मनुष्यजात चांगल्या आणि शाश्वत पध्दतीने पृथ्वीवर नांदावी आणि त्याच्या बरोबर आजूबाजूचा निसर्गही टिकून रहावा अशी रचना आणि विकासनिती सध्या अस्तित्वात असणाऱ्या चंगळवादी अर्थव्यवस्थेमध्ये नाही. २०१५ साली झालेला पॅरीस करार म्हणजे एक विनोद बनून राहिला आहे. पृथ्वीचे तापमान २ डिग्री ने वाढले तर किती महाभयंकर परिणाम होतील याची जाणीव असताना हव्यास कमी होत नाही थोडक्यात जग प्रंचड वेगाने विनाशाकडे घेवुन चाललो आहोत यात शंकाच नाही!
- शुभम गुरव
युथ फॉर नेचर इंडिया
Comments