महाराष्ट्रात ठाणे खाडी हे तिसर रामसर स्थळ घोषीत केल्याने ठाणे खाडी हे महाराष्ट्रामधील सर्वात मोठा व त्याचबरोबर भारतातिल पहिल महानगरात असलेल रामसर स्थळ ठरलेला आहे. ठाणे खाडीचा 6,522.5 हेक्टर मधील 1.690.5 हेक्टर एवढा भाग हा ठाणे खाडी फ्लमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केल आहे. बाकीचे 4,832 हेक्टर भाग हा ईको सेंसिटिव झोन म्हणून राखला आहे.
Photo Credit: Source from Telegram/ Google
ठाणे खाडी रामसर स्थळ घोषीत झालेमुळे महाराष्ट्रात आता तीन रामसर स्थळे झाली आहेत. पहिल नांदूर-माधमेश्वर हे नाशिक जिल्ह्यात 801 हेक्टर परिसरात आहे आणि दुसर लोणार हे 427 हेक्टर एवढ बुलढाणा जिल्ह्यात आहे.
रामसर परिषद हा एक आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय करार आहे. ज्याच्या माध्यमातून जगभरातील पाणथळ जागा व त्याच्यातील संसाधनांचे संवर्धन केले जाते. रामसर हे एका इराणी शहराचे नाव आहे, जेथे 1971 मध्ये हा करार औपचारीक पणे स्वीकारण्यात आला.
Photo Credit: Mayank k
भारतात उत्तरप्रदेश राज्यात सर्वात जास्त रामसर स्थळे आहेत. जगातील सर्वात मोठ पंथानाल हे रामसर स्थळ दक्षिण-अमेरिका मधे स्थित आहे. चिल्का सरोवर जे की ओडिसा मधील केवोलदेव राष्ट्रीय-उद्यानात आहे हे भारतातील सर्वात मोठ रामसर स्थळ आहे.
दलदलीचे प्रदेश हे एक जैवविधतेचे अविभाज्य घटक आहेत ठाण्यासारख्या महानगर परिसरात वाढत्या शहरीकरणामुळे हा परिसर धोक्यात आला होता त्यामुळे ठाणे खाडीला मिळालेला रामसर स्थळाचा दर्जा या ठिकाणच्या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करेल.
- शुभम गुरव
M.Sc. Environment Science
SUK kolhapur
Comments