top of page

तिबोटी खंड्या….

Updated: Jan 18, 2021





भारतामध्ये जवळ-जवळ सर्वञ आढळणारा “तिबोटी खंड्या” कोकणात पावसाळ्यात जास्त सापडतो. त्याचे इंग्रजी नाव “Oriental Dwarf Kingfisher”असे आहे. त्याच्या नावातच छान अस वर्णन केल आहे. ‘तिबोटी खंड्या’ म्हणजे तीन बोटे असणारा खंड्या. तिबोटी खंड्याच वर्णन कराव तेवढ कमीच आहे. त्याचेचमकणारे रंग हे मनाला वेड लावून जातात. हो... हो.... खर आहे हे, त्याचे रंग हे आमच्या सारख्या निसर्गप्रेमींना अक्षरश: वेड लावून जातात आणि आम्हाला खराआनंद देऊन जातात. पिवळा, लाल, गुलाबी, पांढरा आणि काळा अशा विविध रंगाने नटलेला असा हा ‘तिबोटी खंड्या’. तसेच महत्वाच म्हणजे जस आपल्याला टोपण नाव असतं ना अगदी तसच त्याला हि पक्षीनिरिक्षकांनी “ODKF” असे नाव दिले आहे.


तिबोटी खंड्याचा विणीचा काळ हा जुन ते ऑगस्ट हा आहे. तो विणीचा काळ कोकणात घालवतो. त्याच वास्तव्य हे छोटे ओढे आणि जंगल येथे सापडते. छोटे ओढे आणि घनदाट जंगल हे फक्त पावसाळ्यात कोकणातच आढळतात म्हणून तो विणीचा काळ हा कोकणात घालवतो. तो त्याचे घरटे दरडीत मातीमध्ये साधारण एक मीटर आत माती खणून बनवतो. माणसांमध्ये जस प्रेम पहायला मिळत तसच ह्या पशु-पक्षांमध्येही प्रेम पहायला मिळत. नरपक्षी हा घरटे बनवतो व मादी येऊन तपासून जातो. जर तिला तिथे सुरक्षित वाटले तरच ती त्या घरट्यात प्रवेश करते. मग सुरू होतो तो अंडी देण्याचा काळ. जुलै मध्ये ते अंडी घालतात मग मादी पक्षी ते बसून अंडी उबवते. पंधरा ते सतरा दिवसामध्ये पिल्ल बाहेर पडतात. सहसा इतर पक्षांमध्ये १५ ते २० दिवसाचा काळ हा अंडी उबवण्याचा दिसुन येतो, पण मला माझ्या केलेल्या निरीक्षणामध्ये तिबोटी खंड्या ह्या पक्षांच्या प्रजातीचा अंडी उबवण्याचा काळ हा केवळ ५० मिनिटे प्रती दिवस एवढाच सापडतो. त्यानंतर पिल्लांना जन्म दिल्यावर सुरू होतो तो त्यांना खाद्य देण्याचा क्रियाकाळ त्याला इंग्लिश मध्ये “फिंडिग” अस म्हणतात.


तिबोटी खंड्या हा इतर खंड्या पक्षांपेक्षा खुप लहान आहे. तो जवळ-जवळ १३ सेमी एवढा आहे. पण म्हणतात ना “मुर्ती लहान पण किर्ती महान” तसच याच कार्य आहे. हा जरी आकाराने लहान असला तरी त्याचे खाद्य हे इतर पक्षांपेक्षा खुप जास्त आहे. तो सहसा “मोठी पाल, खेकडी, किटक, कोळी खाऊन आपला उदरनिर्वाह करतो. पिल्ले छोटी असताना तो त्यांना छोट्या पाली, छोटे किटक असे खाद्य देतो. जस-जसे त्याची पिल्ले मोठी होतात तस तस मग तो त्यांना मोठी पाली,खेकडी खाद्य म्हणून देतो.


तिबोटी खंड्या हा पाहुणा म्हणून आपल्याकडे येतो. जवळ-जवळ तो दोन ते अडीच महिण्यासाठी आपल्याकडे येतो. मुळचा तो “श्रीलंका, भुतान, कोंलबिया आदी देशातून स्थलांतर करतो. मग तो त्याचा विणीचा काळ संपला कि आपल्या मायदेशी रवाना होतो. या पक्षाचा आवाज ‘ची-ची-ची’ असा आहे. त्याचे घरटे कुठे आहे किंव्हा तो कुठे आहे हे त्याच्या आवाजावरूनच कळते. त्याचे फोटो काढण्यासाठी तासन-तास बसाव लागत. कारण तो कधी हि एका ठिकाणी बसत नाही. कधी दोन मिनीटांत हि त्याचा फोटो मिळतो तर मग कधी कधी दोन-तीन दिवस हि जातात. ते आपल़्या प्रजननासाठी अनूकुल वातावरण बघून आपले स्थलांतर करतात. आता हा तिबोटी खंड्या युरोपलाही जाऊन पोहोचला आहे….


कु. क्रांती मिंडे


वनशास्ञ महाविद्यालय, दापोली

100 views0 comments

Commenti


bottom of page