top of page

प्राण्यांमधील समायोजन

Writer's picture: YouthForNatureIndiaYouthForNatureIndia

Updated: Jan 18, 2021

पृथ्वी म्हणजे विविवधतेच भांडारच जणू. अमेझॉन सारखी वर्षावाने इथेच ,प्रशांत महासगरसारखा भला मोठा समुद्रही इथेच. इथेच आहेत सहरासारखी उष्ण वाळवंटे तर लाहूल, स्पिती सारखी शीत वाळवंटे सुध्दा, माजुलीसारखी नदी पत्रातील बेटे सुद्धा आणि इथंच आढळतो अंटार्क्टिका सारखा बारमाही बर्फाळ प्रदेश. अशा वैविध्यपूर्ण प्रदेशामुळे पृथ्वीवर वैशिष्टयपूर्ण जैवविविधता आढळते.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बदलत्या पर्यावरणातं काही प्राणी ,वनस्पती स्वतःमध्ये बदल करून अनुकूल कौशल्य विकसित करतात. तेथे वंशवृद्धी करतात.जगण्यात यशस्वी ठरतात त्याच एकमेव कारण म्हणजे प्राण्यांमधील होणारे समायोजन ( animal adaptation ) होय. समायोजन म्हणजे उत्क्रांतीचा ( evolution ) चा महत्वाचा भाग असतो किंबहुना संमायोजन म्हणजे उत्क्रांतीचा परिणाम असतो.


वटवाघूळ हा एकमेव सस्तन प्राणी. त्याला हवेत पक्ष्यासारखे झेप घेण्याची प्रतिभा प्राप्त झाली. वटवागूळना डोळे नसतात.ते अल्ट्रा साँनीक किरण वस्तूंवर टाकतात त्यांच्यावरून होणाऱ्या परावर्तनामुळे आपला मार्ग ठरवतात. जणू त्यांचे कानच डोळ्यांसारखे पथदर्शनाचे कार्य करतात. त्यांचे पंख मात्र पिसापासून नव्हे तर त्वचेपासून बनली असते.सारस क्रोच ,फ्लेमिंगो इ. पक्षी पाणथळ जागी आढळतात दलदलीत आढळणारे कृमी, कीटक, मासे इ. त्यांचे आवडते खाद्य .दलदलिटीन खाद्य शोधण्यासाठी लांब ,बळकट ,चोच फायदेशीर ठरते त्यांचे पाय आणि मानही लांब असते. अनेकदा भक्ष्याच्या शोधत ते स्तब्धपणे चिखलात उभे असलेले दिसतात. काही वेळा तर एकाच पायावर उभे राहुन ऊर्जा वाचवतात. पक्ष्यांचे चोचीचा आकार त्यांच्या खांद्यावर अधारित असते.दाणे टिपणाऱ्या (Granivore) पक्ष्यांची चोच छोटी असते तर मांसभक्षी ( scavanger) पक्ष्यांची चोच हुकाच्या आकाराची असते . सुतारपक्षी यांची चोच कठिण असते.फळे , सुपाऱ्या खाणाऱ्या पक्षांची चोच टणक असते असे समायोजन हे structral adaptation म्हणून ओळखले जाते.


वाळवंटात पाणी खूपच कमी उपलब्ध असते तर एकाचवेळी 20 गँलनपेक्षा अधिक पाणी पितो. ते पाणी तो जठरामध्ये स्थुवन ठेवतो गरजेनुसार त्यापाण्याचा वापर करतो म्हणून पाण्याविना उंट बरेच दिवस राहू शकतो. उंटाच्या पाठीवर असणाऱ्या उंचवठा म्हणजेच मदार (Hump) यामध्ये अन्न चरबीच्या रूपात साठवून ठेवलेले असते मदार म्हणजे Food storage houseच म्हणा.जेंव्हा उंटला अन्नाची कमतरता भासते त्यावेळी तो मदार मध्ये असणाऱ्या चरबीचा रूपाततील ऊर्जेचा वापर करतो आणि अतिरिक्त झालेले अन्न चरबीच्या रूपात मदारमध्ये साठवतो. अशा प्रकारे प्राण्यांच्या शरीररचनेत समायोजन (Anatomical adaptation ) घडुन येते.

उंदीर , बेडूक, सारडा ,अस्वले या प्राण्यांना अतिशीत हवामान सहन होत नाही हे प्राणी उन्हाळ्यामध्येच भरपुर पोषण घेतात आणि हिवाळयात ऊर्जा वाचवण्यासाठी संपूर्ण झोपतात( winter sleep/ Hibernation) अनेक पाणथळ पक्षी मूलस्थानी असलेल्या थंडी पासून बचावासाठी उन्हाळ्यात भरतपुर सारख्या उबदार वातावरणात स्थलांतर करतात. Danaid eggfly common mormmon इ पक्ष्यांची आवडती भक्ष्य असणारी फुलपाखरे ही common tiger,common rose, यासारख्या अखाद्य फुलपाखरांची नक्कल करतात असा वर्तुनिकित झालेला बदल behavioral adaptation मुळे होतो..


वनस्पतीसुद्धा जगण्यासाठी समायोजित होतात. समुद्रकाठच्या दलदलयुक्त भागांत खारफुटीची जंगले आढळतात ही जंगले त्सुनामिपासून किनारपट्टीचे संरक्षण करतात .माशांच्या प्रजननासाठी उत्तम अधिवास निर्माण करतात मात्र अशा खारफुटीच्या मूळाना दलदलयुक्त जमीनीमुळे श्वासनास मर्यादा येतात म्हणुन नेहमी सूर्याच्या विरुध्द दिशेनी वाढणारी मुळे खारफुटीच्या बाबतीत मात्र सूर्याच्या दिशेने वाढतात. यांना श्वसना मुळे ( Respiratory Root ) म्हणतात. ही मुळे अनुकुचीदार असतात. निवडुंगासारखी वनस्पती पानांच्यामधून होणार पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पानांचे रूपांतरण ते काट्यामध्ये करतात आणि पाणी वाचवतात.

समायोजन ही एक दिवसात घडणारी क्रिया नव्हे. समायोजन हा हळुहळू होणारा बदल होय.समायोजनामुळे सजीवांच्या जगण्याची शक्यता वाढते समायोजन झालेल्याया प्राण्याची संख्या वाढत असते. त्यांचा वंश टिकून राहतो. मात्र डोडो, डायनासोर सारखे अनेक प्राणी जगण्यासाठी संघर्ष करण्यात व बदलत्या वातावरणात स्वतःमध्ये समाययोजन घडवून आणण्यात असमर्थ ठरतात आणि ते संपुष्टात येतात या बाबतीत Dr spensor johnson यांचं वाक्य चपखल लागू होत. ते म्हणजे If you are not changing then you will be extinct.

- Shubham Kanure


 
 
 

Comments


Get social with us!

We are committed to the conservation of Nature. Awareness is the most effective way to make people environment literate. We can make people aware through education, research, and various activities. When people become environment literate, they form a group of Environment-conscious citizens.

  • Instagram
  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
Share your thoughts!

 

​Telephone : ​+91 7378777067

Email : youthfornatureindia@gmail.com

​​​

© 2020 by YouthForNature

bottom of page