top of page

वारंवार येणारे पूर, वादळे पाहता खरच जग विनाशाकडे चाललाय का?

" हवामान बदलामुळे (climate change) मुळे पृथ्वीवरील दररोज 200 प्रजाती नष्ट होत आहेत याला मानवजात अपवाद ठरेल का "

निसर्गाच्या कुशीत मोकळ्या शुध्द हवेत वेळ घालवायला कोणाला बर नाही आवडणार. सलग दोन दिवस लागून सुट्टी भेटली की महाराष्ट्रातील अर्ध्याहून जास्त कुटूंब एकतर कोकणात जातात किंवा महाबळेश्वर सारख्या निसर्गसपंन्न भागाकडे कूच करतात. निसर्गाबरोबर मानवाच नात अतूट आहे. झाडांच्या गर्द सावलीत आणि डोंगरदर्यातील थंड हवेत मनातील कामाचा ताण,त्रास व दुःख हे सर्व अलगद गायब होऊन जाते आणि उरते ते फक्त समाधान व परिपूर्णतेची जाणीव. विचार केला तर अस लक्षात येता की निसर्गाशिवाय आपला अस्थित्वच शून्य आहे, प्रत्येक गरजेच्या गोष्टीसाठी आपल्याला निसर्गावर अवलंबून रहाव लागत मग ते वीज, पेट्रोल-डीझेल, पिण्याच पाणी, श्वास घेण्यासाठी हवा, किंवा घरासाठी लाकूड असो वा दगड अश्या असंख्य स्त्रोतांच्यासाठी आपण निसर्गाच्या आधिन आहोत. पण गेल्या काही दशकांनपासून आपण गरजेपेक्षा जास्त नैसर्गिक स्त्रोतांचा अविचारी वापर करत आहे. चंगळवाद जोपासण्याच्या हव्यासापोटी पर्यावरणात मोठ्या प्रमाणात ग्रीन हाउस वायू सोडत आहोत. त्याच्यामुळे पृथ्वीचा तापमान वेगाने वाढत आहे.


जगातील पहील्या 20 सर्वाधिक प्रदुषीत शहरांनमधे भारतातील 14 शहर.


प्लास्टिकचा अतिवापर, मोठमोठ्या कारखान्यातून व गाड्यांनमधून निघत असलेल्या विषारी वायूमुळे पर्यावरण संकट मानवजातीने स्वतःवर ओढवून घेतले त्याच्यामुळे निसर्गचक्र पूर्णंपणे बदलत चालला आहे. उन्हाळ्यात जास्तीचा ऊन दरवर्षी रेकॉर्ड मोडायला लागला आहे तर पाऊस कमी वेळेत येवढा धो-धो कोसळतो की सगळीकडे पूरस्थिती तयार होते. त्याच्यामधे कित्येकांचे संसारच्या संसार वाहून जातात, घर पडतात, जिवित हानी होते, सार्वजनिक संपत्तीच नूकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात होता. 2019 साली केलेल्या एका सर्वेमधून असा लक्षात आला आहे की भारतात 17 लाख लोक एका वर्ष्यात हवा प्रदुषणामुळे मृत पावलेले आहेत. जगातील पहिल्या 200 हरीत शहरांनमधे भारतातील एकाही शहराच नाव नाही मात्र जगातील पहील्या 20 सर्वाधिक प्रदुषीत शहरांनमधे भारतातील 14 शहरांचा सामावेश आहे ही खरच खुप लाजीरवाणी गोष्ट आहे.


जगाच फुफ्फूस होरपळून निघत आहे.

आजच्या घडीला सर्व जगात हाहाकार माजलेला आहे. जगाच फुफ्फूस म्हणून ज्याला ओळखतात त्या अमेझॉन जंगलात वणव्यांच प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे. तसेच वणवे ऑस्ट्रेलिया मधे सुद्धा वाढत आहेत लाखो वन्यजीव त्यातून होरपळून निघत आहेत करोडो झाडे जागेवर भस्म होत आहेत. भारतातही गेल्या काही वर्ष्यापासून हवामान बदलामुळे हाहाकार माजला आहे. केदारनाथ मधे आलेला महाभंयकर प्रलय, केरळचा पूर, ओरिसा भागात वारंवार येणारी चक्रीवादळे, कोंकण-सांगली-कोल्हापुर मधील पूरस्थीती, कोकणात येवुन गेलेला निसर्ग चक्रिवादळ या सर्व नैसर्गीक आपत्त्या आपल्याला हेच सांगत आहेत की विनाशाला सुरवात झाली आहे. पर्यावरण पुरक जीवनाचा प्रत्येकाने स्विकार केला नाही तर जगाचा विनाश अटळ आहे. म्हणूनच सर्वानी चंगळवाद नाकारुन वयक्तिक स्थरावर carbon footprint कमी कराव्या लागतील, Carbon footprint म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्ती जीवन जगताना वापर करनार्या प्रत्येक गोष्टीच्या वापरातून काहीतरी प्रदूषण करत असतो ज्याच्यातून ग्रीन हाउस वायू वाढून ग्लोबल वार्मिंग ला गती मिळते. जस की गाडी वापरली की त्याच्यातून तयार होणार्या विषारी वायू मुळे हवा प्रदूषण होता, सांडपाणी जे नदीत सोडला जात त्याच्यातून पाणी प्रदूषण होता, दैनंदिन जीवनात रोज प्लास्टिक वापरतो त्याच्यामुळे प्लास्टिक प्रदूषण होता अशी भरपूर कारण आहेत ज्याच्यातून वयक्तीक स्थरावर प्रदुषण करत आहोत, या सर्व बाबी ध्यानात घेवुन आपण आपला आधिवास सुरक्षित ठेवायला प्रयत्नशील असला पहिजे व प्रदूषणास आळा घालून पुढच्या पिड्यांना राहण्यायोग्य पृथ्वी निर्माण केली पहिजे.


पर्यावरण पुरक जिवन कस जगाव.


1) खासगी वाहनांचा वापर कमीत कमी करुन सार्वजनिक वाहनांचा वापर करावा आणि आपल्या स्वतःचे carbon footprint कमी करण्याकडे लक्ष द्यावे.


2) स्थानिक लोकांनी बनवलेल्या मालाचा वापर जास्तीत जास्त करावा कारण स्थानिक माल जास्त लांबून न आल्यामुळे प्रवास कमी झालेला असतो व कार्बन सहचिन्हे (carbon footprint ) खुप कमी तयार होतात त्यामुळे पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो.


3) जास्तीत जास्त झाडे लावुन त्याचा पोषण कराव कारण झाडे शाबूत राहिली तर मानवजातीचा अस्तित्व टिकून राहील.


4) विमान प्रवासातून जास्तीत जास्त ग्रीन हाउस वायू वातावरणात सोडला जातो त्यामुळे विमान प्रवास गरज नसेल तेव्हा टाळावा.


5) Ac घेण्यापेक्षा Fan घेण्यास तयारी दाखवावी, कारण Ac मधून जो गैस बाहेर पडतो त्याच्यामुळे ओझोन वायू जो की पृथ्वीवर सूर्याची जी अतिनील किरणे येतात त्याच्या पासून संरक्षण करतो त्या ओझोन वायूला Ac मुळे धोका निर्माण होतो.


6) प्लास्टिकचा वापर पुर्णपणे टाळावा कारण प्लास्टिक हा शेकडो वर्ष्ये न कुजनारा पदार्थ आहे जो की निसर्गात तसाच पडून राहतो व वेग वेगळ्या नैसर्गिक समस्या निर्माण करतो. त्याच्यामुळे प्लास्टिक टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा.


7) सेंद्रीय शेतीला प्रोस्ताहन द्यावे कारण त्याच्यामुळे रासायनिक खतांच्या वापरावर मर्यादा येतात आणि ईकोलॉजिकल फूड चेन शाबूत राहण्यास मदत होते, त्याचबरोबर लोकांना सुद्धा निरोगी राहण्यास सेंद्रीय शेती महत्वाची फायदेशीर ठरते.


8) वीजेची बचत करावी कारण विज तयार करण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात कोळसा वापरला जातो. कोळसा ज्वलनातून मोठ्या प्रमाणात हवामान बदलास कारणीभूत असलेला प्रमूख वायू कार्बनडॉय ऑक्साइड मोठ्या प्रमाणात हवेत सोडला जातो.


लेखक:

शुभम गुरव

वनशास्त्र पदवीधर


अधिक माहिती साठी खलील लिंक वर क्लिक करा



104 views0 comments

Comentários


bottom of page