World Nature Conservation Day - 2020
July - 28
World Nature Conservation Day is celebrated on July 28 across the world in order to raise awareness about protecting nature and conserving our natural resources.
With problems like deforestation and illegal wildlife trade on the rise, nature conservation has gone up on the list of priorities for a lot of countries.
नमस्कार,
मी निसर्ग बोलत आहे. आज वर्षानुवर्षे मी तुमच्यासोबत आहे. पण तुम्ही म्हणाल की आम्ही तर तुला आमच्या सोबत कधीच पाहिलं नाही? असं कसं? होय असंच आहे. बघा एक नजर आजूबाजूला टाकून. तुम्ही राहत असलेल्या घरामध्ये देखील मीच आहे. तुम्ही वापरत असलेलं फर्निचर, लाकडी वस्तू, दरवाजे, खिडक्या सगळ्यात मीच आहे. माझ्या बऱ्याच स्रोतांचा वापर तुम्ही करत आहात. प्रत्येक बदलत्या ऋतूनुसार तुम्ही माझ्याकडून काही न काही घेतच असता. उन्हाळ्यात ज्वलनासाठी इंधन, मध, डिंक, करवंद, पालापाचोळा तर पावसाळ्यात रानभाज्या, गुरांसाठी चारा, मासे आणि वापरासाठी मुबलक प्रमाणात पाणी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आज जो मोकळा श्वास घेताय तो फक्त माझ्यामुळेच. माझ्याकडून बऱ्याच गोष्टी घेताय पण त्या बदल्यात मला काय देताय?
याचं उत्तर कदाचित 'काहीच नाही' असे असेल तुमच्याकडे पण माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही मला खूप काही देताय पण जे मला काहीच उपयोगी नाही असं. तुम्ही फिरायला येता तेव्हा बराच प्लास्टिक कचरा मला देऊन जाता जो मी बरीच वर्ष पचवू शकत नाही. तुमच्या जीवनाचा एक तटस्थ स्तंभ म्हणून मी कायम उभा आहे.पण माझी कत्तल करताना तुमचे हात अजिबात थरथरत नाहीत. जसं तुमचं एक कुटुंब आहे तसं माझं देखील एक कुटुंब आहे. प्राणी, पक्षी, कीटक, सरीसृप हे माझंएच सदस्य आहेत.हे तुम्हाला चांगलेच परिचयाचे आहेत. माझ्या बऱ्याच सदस्यांना तुम्ही गाडीखाली चिरडता, जंगलात गेल्यावर तुम्ही गोंधळ करून त्यांना घाबरून टाकता. इतकंच काय तर माझ्या कुटुंबातील काही सदस्यांची कत्तल देखील करता. तुमच्या अशा स्वार्थ वागणुकी मुले माझे सदस्य मला कायमचे सोडून चालले आहेत.माझाच एक नियम आहे जो तुम्ही विसरत चालला आहात. जसे पेराल तसेच उगवेल. तुम्ही आज माझ्यासोबत जसे वागाल तसेच मी काहीतरी परत करेन.
आज २८ जुलै " जागतिक निसर्ग संवर्धन" दिवस आहे म्हणून मी तुमच्यासमोर व्यक्त झालो.
तुमचाच निसर्ग
लेखन - तुषार भोईर